परवानाधारक शस्त्रे जमा करावी लागणार ; पोलिसांकडून मोहीम सुरू 

licensed weapons will have to be deposited kolhapur municipal corporation election
licensed weapons will have to be deposited kolhapur municipal corporation election
Updated on: 

कोल्हापूर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील परवानाधारक शस्त्रे पोलिसांकडून जमा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील चारही पोलिस ठाण्याबरोबरच शहराला लागून असलेल्या करवीर तालुक्‍यातील काही गावांतील शस्त्रेही जमा करावी लागणार आहेत. 

महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सद्या सुरू आहे. एप्रिलमध्ये निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्‍यता आहे. प्रत्येक निवडणुकीतील चुरस लक्षात घेता पोलिसांनी आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस ठाणेनिहाय परवानाधारक शस्त्रे असलेल्या लोकांना संपर्क साधून त्यांच्याकडील शस्त्रे जमा करण्यास सांगण्यात येत आहे. 

प्रत्येक पोलिस ठाण्याकडे त्यांच्या हद्दीत असलेल्या शस्त्र परवानाधारकांची नांवे आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात पोलिसांपेक्षा नागरिकांकडे शस्त्रे किंवा परवाने जास्त आहेत. शस्त्र परवाना घेताना पोलिसांचा ना-हरकत दाखल लागतो. आता तर शस्त्रांसह परवानाधारकांची नोंद थेट केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केलेली आहे. त्यासाठीचा संपूर्ण "डाटा' पोलिसांकडे उपलब्ध आहे. जे परवानाधारक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत किंवा ज्यांचे नातेवाईक निवडणूक लढवणार आहेत, पहिल्या टप्प्यात अशा लोकांची शस्त्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सुरूवातीला फोनवरून संपर्क साधून शस्त्रे जमा करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातूनही काहींना शस्त्रे जमा न केल्यास त्यांची शस्त्रे पोलिस घरी पाठवून जप्त करण्यात येणार आहेत. 

शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा व राजारामपुरी पोलिस ठाण्यातील गोपनीय विभाग या कामाला लागला आहे. याच चार पोलिस ठाण्यापैकी शाहुपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शस्त्र परवानाधारकांची संख्या मोठी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ज्यांनी यापूर्वीच बॅंकेच्या किंवा इतर लॉकर्समध्ये शस्त्रे ठेवली आहेत, अशा परवानाधारकांना वगळून इतरांची शस्त्रे जमा करावी लागणार आहेत. अलिकड वाढदिवस, लग्न समारंभ किंवा हौस म्हणून हवेत गोळीबार करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अशा पद्धतीने गोळीबार करणे हा गुन्हा आहे. संबंधितांवर यापूर्वी कारवाया झाल्या आहेत. अशांचा परवानाही रद्द करण्याची शिफारस पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com