

Gokul Dudh Dairy Kolhapur Directors Meeting
esakal
Gokul Directors Meeting : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत बैठक व्यवस्थेवरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या संचालकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. खुर्च्या कुठे लावल्या आहेत, यावरून सुरू झालेला हा वाद काही काळ रंगला. अखेर खुर्च्यांची व्यवस्था बदलल्यानंतर या वादावर पडदा पडला. अध्यक्ष राजेश पाटील यांनाही यावेळी मध्यस्थी करावी लागली.