

Hasan Mushrif Shivaji Patil kolhapur
esakal
Political clash Kolhapur : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतील महत्त्वाची समजली जाणारी ठराव प्रक्रिया सुरू करून या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच मंत्री हसन मुश्रीफ यांनी बाजी मारतानाच आपली राजकीय मुत्सद्देगिरी पुन्हा सिद्ध केली. या निर्णयाने न्यायालयीन प्रक्रियेद्वारे ‘गोकुळ’ची निवडणूक लांबविण्याच्या प्रयत्नात असलेल्या आमदार शिवाजी पाटील व प्रकाश बेलवाडे यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.