

Khidrapur Kopeshwar Temple Tripurari Purnima
esakal
Supermoon in Maharashtra : भारतीय स्थापत्यकलेचा अद्वितीय वारसा असलेल्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आज (मंगळवारी) मध्यरात्री एक अनोखा खगोलीय नजारा अनुभवायला मिळणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आकाशात दिसणारा सुपरमून मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वर्ग मंडपाच्या मध्यभागी येणार असून, त्याचा चंद्रप्रकाश जमिनीवरील वर्तुळाकार दगडी शिल्पावर पडणार आहे. रात्री १२.३० वाजता घडणारी ही खगोलीय घटना काही मिनिटांसाठी अनुभवता येणार आहे.