

Political Sugar Empires Under Scrutiny Over Massive Cane Payment Arrears
sakal
सोलापूर: सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संबंधित असलेल्या साखर कारखान्यांकडे २१८ कोटी रुपयांची ऊसबिले थकीत आहेत. सत्ताधारी पक्षातील आमदारांशी संबंधित कारखान्यांकडे सर्वाधिक रक्कम थकीत आहे. यामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील सिद्धेश्वरकडे ३०.४४ कोटी, तर मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारीकडे ३०.२२ कोटी आणि उमरगा तालुक्यातील विठ्ठलसाई कारखान्याकडे २०.७७ कोटी रुपयांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे १२८ कोटी, तर धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांकडे ९० कोटी रुपये थकीत आहेत.