

Summer Rush Boosts Solapur-Goa Air Travel; Seats Sold Out Till June 10
sakal
सोलापूर : सोलापूर-गोवा विमानसेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून १० जूनपर्यंतची बहुतांश आसने आरक्षित झाली आहेत. वाढत्या मागणीमुळे गोवा मार्गावरील तिकीटदर २,७०० रुपयांपासून १२ हजार रुपयांपर्यंत पोचले आहेत. दरम्यान, ९ जून रोजी सोलापूर-गोवा विमानसेवेला एक वर्ष पूर्ण होत असून या कालावधीत १४ हजारांहून अधिक प्रवाशांनी हवाई प्रवासाचा लाभ घेतला आहे.