

Maharashtra Highway Greenery Push Calls for Native Tarwad Plantation on Solapur Tuljapur Road to Support Local Biodiversity
sakal
सोलापूर : शेतीतील जैवविविधता टिकविण्यासह फुलपाखरांचे संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाची असलेली तरवड वनस्पती दुर्मिळ होत आहे. आध्यात्मिकदृष्ट्याही विशेष महत्त्व असलेल्या या स्थानिक वनस्पतीचे संवर्धन करण्यासाठी सोलापूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकांत नियोजनबद्ध लागवड करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.