'विठाई'त झाला 'माऊली'चा जन्म; आनंद अश्रूंनी आईचे डोळे पाणावले

बाळ आणि बाळंतिणीची तब्येत एकदम चांगली आहे.
'विठाई'त झाला 'माऊली'चा जन्म; आनंद अश्रूंनी आईचे डोळे पाणावले
Updated on

मिरज : जतहुन सांगलीमार्गे कोल्हापूरकडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या "विठाई" गाडीत वनीता शामराव गुळवे (रा. गोंधळेवाडी ता. जत) या गर्भवतीने गोंडस बाळास जन्म दिला. दोघांनाही भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. बाळ आणि बाळांतिणीची तब्येत एकदम चांगली असल्याचे भोसे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य आधिका-यांनी सांगितले.

'विठाई'त झाला 'माऊली'चा जन्म; आनंद अश्रूंनी आईचे डोळे पाणावले
पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात कोल्हापूरचे दोघे ठार

गोंधळेवाडी येथे राहणारी वनिता गुळवे ही गर्भवती महिला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात बाळंतपणास दाखल होण्यास निघाली होती. जत बस स्थानकावर जत-कोल्हापूर या "विठाई" गाडीत बसली. बसने कवठेमंकाळ बस स्थानक सोडताच या महिलेच्या पोटात दुखू लागले. चालकाने गाडी रस्त्याकडेला घेतली याचवेळी या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. चालक बी.टी.माने यांनी तातडीने गाडी भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली.

'विठाई'त झाला 'माऊली'चा जन्म; आनंद अश्रूंनी आईचे डोळे पाणावले
उदय सामंत यांच्या भावाचा प्रशासनावर दबाव ; नीतेश राणेंचा आरोप

दरम्यान बाळ आणि बाळंतिणीस या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी बाळंतिणीची तपासणी केली असता, दोघांचीही तब्येत उत्तम असल्याचे सांगून रुग्णालयात दाखल करून घेतले. एसटीचे या विठाई बसचे चालक बी. टी. माने आणि वाहक एस. एस. चव्हाण या दोघांचेही जतच्या आगार व्यवस्थापकांनी यांनी विशेष अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com