शेतकरी कुटुंबात जन्म, २०१९ ला तहसीलदार; वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी सांगलीच्या सुपुत्राचा दुर्दैवी अंत

Rakesh Gidde Death in Accident सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि केजचे तहसिलदार राकेश गिड्डे यांचं अंबाजोगाई इथं अपघातात निधन झालं. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी अकाली निधनामुळे प्रशासनासह सांगलीत शोककळा पसरलीय.
Tehsildar Rakesh Gidde Passes Away

Tehsildar Rakesh Gidde Passes Away

Esakal

Updated on

बीडमधील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजता त्यांचा लातूर अंबाजोगाई महामार्गावर अपघात झाला. राकेश गिड्डे यांची कार उलटून ही दुर्घटना घडली. मूळचे सांगली जिल्ह्यातले असलेल्या राकेश गिड्डे यांची कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख होती. केजमध्ये महसूल विभागात त्यांनी धोरणात्मक निर्णय घेत जनहिताची अनेक कामे मार्गी लावली होती. tehsildar Rakesh Gidde tragic death

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com