

swanandi from veen doghatli hi tutena
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' सध्या सुंदर अशा वळणावर आहे. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर एक घट्ट पकड ठेवलीये ज्यामुळे प्रेक्षक या मालिकेत गुंतून राहतात. यातील समर आणि स्वानंदीची जोडी तर चाहत्यांना आवडतेच सोबतच मालिकेतील स्वानंदीच्या आईला होणारी शिक्षा, आत्याचं वागणं या सगळ्यावर प्रेक्षक आपली मतं मांडताना दिसतात. अशातच आता मालिकेत स्वानंदीचा एक नवीन लूक पाहायला मिळणार आहे. ज्याचे फोटो स्वतः तेजश्री प्रधानने चाहत्यांसोबत शेअर केलेत.