Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana 2026
Sakal
मंचर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील ५९ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतील पात्र शेतकऱ्यांना योजनेच्या पहिल्या टप्प्यात १ हजार ५७८ शेतकऱ्यांच्या ९ कोटी ८५ लाख ९ हजार २२० रुपये कर्जमाफीस मंजुरी मिळाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्षेत्रातील १०८ गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित लाभार्थींनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आंबेगाव तालुका विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड यांनी दिली.