

Ketan Agrawal death case
esakal
Loahagad Murder Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात एकीकडे रोज नवनवे खुलासे होत असताना दुसरीकडे वकीलपत्रावरुन चांगलाच वाद रंगला आहे. मुख्य संशयित असलेली सिया गोयल हिचं वकीलपत्र आपल्याला मिळालं आहे, असं दोन वेगवेगळे वकील सांगत होते. मात्र प्रत्यक्ष कोर्टात सियाने जेव्हा आपल्या वकीलाचं नाव सांगितलं तेव्हा दुसऱ्या वकीलाने सियाच्या भावाला नुकसानभरपाईची नोटीस धाडली आहे.