

Crores Spent, Yet Leaking Roof at Pune Crematorium Exposes Civic Negligence
esakal
पुणे: पुणे महापालिका स्मशानभूमीच्या देखभाल दुरूस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. मात्र, आज कोथरूडमधील स्मशानभूमीच्या छताला असंख्य छिद्र पडलेले असतानाही पत्रे बदलण्यात आले नाहीत. या गळक्या छताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर नागरिकांनी प्रचंड टीका केली. अखेर दुपारी छताचे पत्रे बदलण्याचे काम सुरु केले.