Pune Weather: पुण्याला पावसाचा तडाखा! रस्ते जलमय, वाहतूक विस्कळीत; घाटमाथ्यासाठी दोन दिवस 'रेड अलर्ट'

Heavy rainfall disrupts traffic in Pune as IMD issues red alert: सततच्या मुसळधार पावसाने पुण्यात सखल भाग जलमय, प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी; पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’
Rain Batters Pune City; IMD Warns of Extremely Heavy Rainfall in Ghat Region

Rain Batters Pune City; IMD Warns of Extremely Heavy Rainfall in Ghat Region

esakal

Updated on

पुणे : गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाच्या हलक्या सरींनी शुक्रवारी (ता. ३) चांगलाच जोर धरला. सकाळपासूनच पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आणि वाहनांचा वेग मंदावला. तसेच पुढील तीन ते चार दिवस शहरात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. तर, जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता असल्याने घाट विभागाला पुढील दोन दिवसांसाठी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com