

राहुल गांधींची भूमिका संधीसाधू : राहुल नार्वेकर
कोल्हापूर, ता. २२: राहुल गांधी अनेक वर्षे लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांना युवा पिढीबद्दल आपुलकी किंवा चिंता असती तर त्यांनी त्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडले असते. पण त्यांनी युवकांच्या प्रश्नावर लोकसभेत कधीच आवाज उठवला नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेतून संधिसाधूपणा दिसून येतो. अशी टिका विधानसभा अध्यक्ष राहुल रार्वेकर यांनी केली. आज त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
राहुल गांधी यांच्या पुणे येथील कार्यक्रमाबद्दल विचारले असता राहुल नार्वेकर म्हणाले, ‘लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्यासाठी आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र आंदोलनाच्या नावाखाली कोणी अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करेल तर त्यांच्यावर प्रशासनाला कारवाई करावीच लागेल. राहुल गांधी हे लोकसभेचे सदस्य असून विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांना युवा पिढीच्या प्रश्नांबद्दल चिंता वाटत असती तर त्यांनी या प्रश्नावर लोकसभेत आवाज उठवला असता. पण त्यांनी असे कधीच केले नाही. त्यामुळे राहुल गांधीं यांच्या भूमिकेतून संधिसाधूपण दिसून येतो.’
संजय राऊत यांच्याबद्दल नार्वेकर म्हणाले, ‘न्यायालयातील युक्तिवाद म्हणजे निकाल नव्हे. संजय राऊत यांच्या घाईमुळेच त्यांचा पक्ष आणि नेतृत्व अडचणीत आले आहे. त्यांनी याचा विचार करावा.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.