

Sharad Pawar on NEET Case
esakal
NEET Paper Leak Case : नीट परीक्षा प्रकरणात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर यापूर्वीच झाला असता, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. सध्या या विषयाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्यांनी माझ्यासोबत काम केले असून ते अत्यंत प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी आहेत. त्यांच्या कामाचे सकारात्मक परिणाम येत्या दोन महिन्यांत दिसून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच शिक्षण क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले.