

RBI MPC Meeting Update: आरबीआयने कर्ज स्वस्त केले आहे. पाच वर्षांत प्रथमच RBIने आपल्या पॉलिसी रेट म्हणजेच रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर सध्याच्या 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के करण्यात आला आहे.
आरबीआयच्या या घोषणेमुळे बँका आणि गृहकर्ज गृह वित्त कंपन्याही व्याजदरात कपात करणार आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे होम लोन, कार लोन, एज्युकेशन लोन आणि पर्सनल लोन वरील व्याजदर कमी होण्याची अपेक्षा आहे.