

US Green Card Restrictions Impact Indian IT Professionals
esakal
Trump IT crackdown: अमेरिकेतील नोकरीच्या माध्यमातून कायमस्वरूपी वास्तव्य मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय IT कर्मचाऱ्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोबी या आठ कंपन्यांना अमेरिकेच्या PERM ग्रीन कार्ड प्रक्रियेतून निलंबित केले. या कंपन्यांशी संबंधित नवीन अर्ज स्वीकारणे आणि प्रलंबित अर्जांवर प्रक्रिया करणे थांबवण्यात आले आहे. या निर्णयामुळे अमेरिकेत H-1B व्हिसावर काम करणाऱ्या आणि नियोक्त्याच्या माध्यमातून ग्रीन कार्ड मिळवण्याची तयारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योजनांवर परिणाम होऊ शकतो.