Nana Patekar: नानासारखी माणसं मरत नसतात...

Nana Patekar Lives On Through His Social Work and Legacy: पडद्यावरचा अभिनेता नव्हे, माणुसकीचा हिरो; नाना पाटेकरांच्या कार्याच्या आठवणी
Nana Patekar Tribute Naam Foundation and His Lasting Legacy of Supporting Farmer Families and Helping Rural Communities in Maharashtra

Nana Patekar Tribute Naam Foundation and His Lasting Legacy of Supporting Farmer Families and Helping Rural Communities in Maharashtra

sakal

Updated on: 

-महेश मांजरेकर

नानासारखी माणसं मरत नाहीत, ती कायमच आपल्यासोबत राहतील असं आपण गृहित धरतो. त्यामुळं नानाचं जाणं हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे. मी नानाला १९८५ पासून ओळखतो. तेव्हा आम्ही थिएटर करीत होतो. ‘अंधायुग’ या नाटकात नाना व राज बब्बर काम करीत होते. आम्हा चार-पाच जणांना या नाटकासाठी बोलावलं होतं. नाना तेव्हा स्टार असलेल्या राज बब्बरसमोर काम करतोय याचं आम्हाला मोठं अप्रूप. आम्हाला स्टेजवर नक्की कुठं उभं राहायचं हेही समजत नव्हतं. त्यामुळं असिस्टंट आमच्याशी नीट वागला नाही. जेवणाच्या सुट्टीत नानानं आम्हाला त्याच्या खोलीत बोलावून घेतलं व त्या असिस्टंटला आमच्यासमोर खूप झापलं. तेव्हा नायकाच्या खोलीत बसून जेवायला मिळालं, ही आमच्यासारख्या उमेदवारी करणाऱ्यासाठी मोठी गोष्ट होती. तेव्हापासून मी नानाचा ‘फॅन’ झालो ते आजपर्यंत!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com