ढिंग टांग : पुन्हा नवनिर्माण..!

शिवतीर्थावरून ‘पुनश्च हरि ॐ’चा नारा; नवनिर्माणाच्या गजरात साहेबांची नव्या महाराष्ट्राची हाक
Reshuffling the Ranks: Is MNS Gearing Up for a Major Organizational Change?

Reshuffling the Ranks: Is MNS Gearing Up for a Major Organizational Change?

Sakal

Updated on

शिवतीर्थाच्या बालेकिल्ल्यातील सर्व फॅन (पक्षी : छताचे पंखे) ऑनवर फिरत होते. मार्चच्या झळा नुकत्याच सुरू झाल्या होत्या. गवाक्षाच्या दिशेने राजमुख करोन उभ्या असलेल्या पाठमोऱ्या साहेबांनी धीरगंभीर आवाजात म्हटले, ‘‘पुनश्च हरि ॐ!’’

दशदिशात आवाज घुमला. शिवाजी पार्काच्या सभोवताल फालतू टाइमपास करणारी कबुतरे (अतिशय लोचट जात! बंद करा ते कबुतरखाने!!) अस्मानात उडाली. पुन्हा बसली. मॉर्निंग वॉकच्या नावाखाली मिसळ, घावणे, साबुदाणा वडा आदी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आरोग्यदक्ष नागरिक चपापले. पुन्हा वडा खाऊ लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com