

Kawadi Erases the Curse of 'Water Nearby, Thirst Still Dry' With Remarkable Village Transformation
sakal
भोसे : जावळी तालुक्यातील महू- हातगेघर धरणामुळे विस्थापित व्हावे लागलेल्या डोंगरपायथ्याच्या कावडी गावाने श्रमशक्ती आणि एकजुटीच्या जोरावर ग्रामविकासाची नांदी घडवत, परिसरात विकासाचे नंदनवन फुलवले आहे. विस्थापनाचे दु:ख बाजूला सारत, ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ हा शाप पुसून टाकत ४०० लोकवस्तीच्या या गावाने घडवलेली क्रांती सध्या पाचगणी- महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.