सातारा : दक्षिण, उत्तरला वाढले १५ हजार ८०० मतदार

कऱ्हाडला मतदान नोंदणी व जनजागृती उपक्रमास मोठा प्रतिसाद
Voter List
Voter ListSakal
Updated on

कऱ्हाड : मतदार जनजागृतीसह मतदार नोंदणी कार्यक्रमाची कऱ्हाड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. त्याअंतर्गत कऱ्हाड उत्तरमध्ये सहा हजार ७५५, तर दक्षिणमध्ये नऊ हजार ५२ नवीन मतदारांची नोंदणी झाली. त्यात १८ ते १९ वयोगटातील उत्तरमध्ये एक हजार ९९४, तर दक्षिणमध्ये दोन हजार ४६५ मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी उत्तम दिघे व सहायक मतदार नोंदणी अधिकारी विजय पवार यांनी दिली.

Voter List
सातारा जिल्ह्यात नवे दीड हजार बाधित; कोरोनाबाधितांचा संक्रमण दर २९ टक्के

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कऱ्हाड उत्तर व कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविद्यालयीन नवमतदार, वंचित मतदार, तृतीय पंथी, महिला मतदारांच्या नोंदणीसाठी प्रयत्न झाले. निवडणूक आयोगाच्या व्होटर अॅप व एनव्हीएसपी पोर्टलची माहिती देण्यात आली. अपंग, तृतीयपंथी, शरीर विक्रय करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाशी संपर्क साधून वंचित मतदारांची नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मतदार नोंदणी अधिकारी दिघे व सहायक मतदार नोंदणी अधिकारी पवार यांनी सर्व राजकीय पक्ष, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व प्रशासकीय कार्यालय प्रमुखांची बैठक घेतली.

दोन्ही विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना निवडणूक आयोगाच्या गरुडा अॅपचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमांतर्गत कऱ्हाड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये १५ हजार ८०७ मतदार वाढले आहेत. त्यासाठी निवडणूक शाखेतील अधिकारी, कर्मचारी, तलाठी, मंडल अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांनी विशेष प्रयत्न केले.

Voter List
दलित समाजातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे? भालवडीत वाद

२५ जानेवारीला विविध स्पर्धा

राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य २५ जानेवारीला महाविद्यालय स्तरावर निबंध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, भित्तिपत्रक, मीम, गाणे, विडंबन काव्य, घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन केले आहे. निवडणूक नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करणारे अधिकारी, कर्मचारी यांचाही पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येईल, असेही प्रांताधिकारी दिघे यांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Who is Yashwant Jagtap from Satara?
Satara Pune Highway monsoon road safety
Sanjivaraje Naik-Nimbalkar Alleges Conspiracy to Close Cooperative Sugar Factory
Original Members' Rights Must Be Protected, Says MP on Shriram Cooperative
Marathi News Esakal
www.esakal.com