

Maharashtra Drought News Karad Koregaon Farmers Demand Drought Status After Severe Dry Spell Damages Kharif Crops
sakal
-सचिन शिंदे, पांडुरंग बर्गे
कऱ्हाड, कोरेगाव: दुष्काळी परिस्थितीमुळे कोरेगाव व कऱ्हाड तालुक्यांत शेंगा भरण्याच्या काळातच सोयाबीन वाळून गेले आहे. भुईमुगाच्या आऱ्या मातीतच करपल्या आहेत. कष्टाने पिकवलेले शिवार डोळ्यांसमोर करपताना पाहण्याशिवाय शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही. दुष्काळाच्या झळा सोसत असतानाही कोरेगाव व कऱ्हाड तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश न झाल्याने बळीराजा आक्रोश करत आहे. या दोन्ही तालुक्यांत जिरायती, कोरडवाहू पिकांचे ५० ते ८० टक्के नुकसानीचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.