

RBI Ten Year Rule Sparks Tension in Satara District Bank as Nine Directors Face Uncertainty Over Their Election Future
sakal
-उमेश बांबरे
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सलग दहा वर्षे संचालकांच्या अपात्रतेचा मुद्दा तापला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकिंग नियमावलीत केलेल्या बदलांनुसार सलग दहा वर्षे संचालक पदावर राहिलेल्या व्यक्तींना नव्या निवडणुकीसाठी अपात्र मानले जाण्याची शक्यता आहे. मात्र, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण आणि स्थानिक सहकार अधिकारी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे उमेदवार आणि राजकीय वर्तुळात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या जिल्हा बॅंकेच्या रिंगणात असे नऊ संचालक असून, त्यांच्यात या नव्या नियमाबाबत असलेल्या संभ्रमामुळे या वेळी निवडणूक लढायची की थांबायचे, या विचाराने ग्रासले आहे.