Mahabaleshwar Tourism : महाराष्ट्राचं मिनी काश्मीर महाबळेश्‍वर पर्यटकांच्या गर्दीनं गजबजलं; खरेदीसाठी महिलांची झुंबड

महाबळेश्वर पर्यटनस्थळ दिवाळी हंगामासाठी (Diwali Season) सज्ज झाले आहे.
Mahabaleshwar Satara
Mahabaleshwar Sataraesakal
Updated on
Summary

सध्या महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगामासाठी गर्दी झाली आहे.

महाबळेश्वर : महाबळेश्वर (Mahabaleshwar) महाराष्ट्रातले पहिल्या पसंतीचे पर्यटनस्थळ दिवाळी हंगामासाठी (Diwali Season) सज्ज झाले आहे. पावसाळ्याची कात टाकून रंगरंगोटीने सजून महाबळेश्वर बाजारपेठ पर्यटकांनी (Tourists) फुलून गेली आहे.

नुकताच पावसाळा संपला आणि दसऱ्यापर्यंत येथील नागरिक साफसफाई करून दिवाळी हंगामाच्या तयारीत असतात. त्यानंतर नवीन मालाची खरेदी करून बाजारपेठ दिवाळीच्या तयारीत पर्यटकांची वाट बघत असतात. यावेळी लक्ष्मीपूजनपर्यंत पर्यटकांची तुरळक गर्दी दिसत होती.

Mahabaleshwar Satara
Tirupati Balaji Darshan : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी 21 मिनिटांत सव्वादोन लाख तिकिटांची विक्री; Online Booking सुरू

आता पर्यटक बाहेर पडले असून, आज येथील बाजारपेठ पर्यटकांनी भरून गेल्याने व्यापाऱ्यांत नवचैतन्य निर्माण झाले असून, दिवाळी हंगामासाठी सर्वजण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या अद्याप थंडी नसल्याने येथील आल्हाददायक वातावरणाचा आनंद बाजारपेठेत फेरफटका मारताना पर्यटक घेताना दिसतात, तर महिलांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे.

Mahabaleshwar Satara
Mahadik Family Diwali : माहोल दिवाळीचा, पण चर्चा निवडणुकांची; महाडिकांच्या फराळाला कोण-कोण नेते उपस्थित?

सध्या महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगामासाठी गर्दी झाली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे. तसेच बाजारपेठेत देखील पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Wilson Point Mahabaleshwar entry restrictions
Pratapgad search and rescue team mission
Khed Mahabaleshwar cable stayed bridge
What are the best places to visit in Mahabaleshwar?
Marathi News Esakal
www.esakal.com