Dhule : जातीचे 15 हजारांवर विद्यार्थ्यांना मोफत दाखले

Caste Certificate
Caste Certificateesakal

धुळे : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या धुळे प्रकल्प कार्यालयातर्फे शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील १५ हजार ८७५ विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्यांचे मोफत आणि रेकॉर्डब्रेक वितरण करण्यात आले.

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या पुढाकाराने राज्यात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात आला. (Caste certificate for over 15 thousand students Dhule Latest Marathi News)

धुळे प्रकल्पांतर्गत २२ शासकीय व ३४ अनुदानित आश्रमशाळेत दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना एक ऑगस्ट म्हणजेच महसूल दिनी जात व अधिवास प्रमाणपत्र देण्याचे नियोजन प्रातांधिकारी व प्रकल्प कार्यालयाने केले. प्रकल्प कार्यालयातर्फे न्युक्लिअस बजेट योजना व शिक्षण विभागाच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

या पार्श्वभूमीवर २० जुलै २०२२ पर्यंत सर्व ५६ शाळेतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचे संकलन करण्यात आले. ही कागदपत्रे महा- ई सेवा केंद्राच्या संचालकांकडे देण्यात आली. त्यांनी २१ ते २६ जुलै या कालावधीत कामकाज पूर्ण केले.

पुढे २७ ते २९ जुलै या कालावधीत प्रांताधिकारी व तहसील कार्यालयस्तरावर प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली. नंतर पुन्हा महा- ई सेवा केंद्र आणि शाळांकडे ही प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यात १५ हजार ८७५ जातीच्या व १४ हजार ३५२ अधिवास प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

यासाठी शिरपूर प्रांताधिकारी व तहसील कार्यालय, चारही तालुक्यांचे संबंधित अधिकारी व कर्मचारी, महा- ई सेवा केंद्राचे समन्वयक राहुल वाघ, शिक्षण विभाग, आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांचे योगदान लाभले.

Caste Certificate
काँग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रा; साळवेतील क्रांती स्मारकापासून आज सुरवात

"अनुसूचित जमातीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची जातीच्या दाखल्यांसाठी धावपळ होवू नये, म्हणून १५ जुलैपासून हा उपक्रम राबविण्यास सुरवात झाली. आदिवासी दिनापर्यंत प्रमाणपत्रांचे वितरण होणार आहे."

- तृप्ती धोडमिसे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे

"मी आश्रमशाळेत आठवीत आहे. मला अधिवास व जातप्रमाणपत्र थेट शाळेत मिळाले. अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यामुळे विद्यार्थ्यांना हा मोफत लाभ मिळाला. त्यांच्यामुळे हेलपाटे, पैसे, वेळेत बचत होऊन शैक्षणिक नुकसान टळले."

- अश्‍विनी पावरा, विद्यार्थिनी, कोडीद (ता. शिरपूर, जि. धुळे)

Caste Certificate
नवापूरात ‘एक शाम शहिदों के नाम’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com