काँग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रा; साळवेतील क्रांती स्मारकापासून आज सुरवात

MLA Kunal Patil speaking at a meeting on Monday in preparation for the Azadi Gaurav Padayatra to be taken out by the Congress.
MLA Kunal Patil speaking at a meeting on Monday in preparation for the Azadi Gaurav Padayatra to be taken out by the Congress.esakal

धुळे : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्यांना वंदन करण्यासाठी काँग्रेसतर्फे साळवे (चिमठाणे, ता. शिंदखेडा) येथील क्रांती स्मारकापासून मंगळवारी (ता. ९) सकाळी आठला, तर कापडणे (ता. धुळे) येथून बुधवारी (ता. १०) सकाळी आठला आझादी गौरव पदयात्रेस सुरवात होणार आहे. आमदार कुणाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर यांनी ही माहिती दिली. (Azadi Gaurav Padayatra by Congress Starting today from revolution memorial in Savle dhule Latest Marathi News)

श्री. सनेर यांनी सांगितले, काँग्रेसच्या सहभागाने देशाचा स्वातंत्र्य लढा तिरंग्याखाली लढला गेला. ही गौरव गाथा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेत बिंबविण्यासाठी पदयात्रा काढली जात आहे. ती १५ ऑगस्टपर्यंत असेल. क्रांती स्मारकाजवळ ब्रिटिश साम्राज्याचा खजिना लुटून ती रक्‍कम स्वातंत्र्य चळवळीसाठी वापरण्यात आली.

या लढ्यातील जिल्ह्यातील थोर विभुतींना अभिवादन करून आमदार पाटील यांच्या हस्ते पदयात्रेस सुरवात होईल. पक्ष पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी सकाळी साडेसातला क्रांती स्मारकाजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. सनेर यांनी केले. मेथी, कामपूर, विखरणमार्गे दोंडाईचा शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ पदयात्रेची सांगता होईल.

MLA Kunal Patil speaking at a meeting on Monday in preparation for the Azadi Gaurav Padayatra to be taken out by the Congress.
जिद्द : सेंट्रिंग कामगाराच्या मुलीचा जगभरात डंका

तयारीला वेग : पाटील

पदयात्रेच्या तयारीसाठी येथील आमदार संपर्क कार्यालयात प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत तालुक्यात कापडण्यापासून बुधवारी सकाळी आठला पदयात्रा सुरू होईल. प्रत्येक जिल्ह्यात ७५ किमी पदयात्रा काढली जाणार आहे.

देशात दडपशाही सुरु असून स्वातंत्र्याचा इतिहास पुसून टाकण्याचे कारस्थान सत्ताधारी करीत आहेत. ते मोडीत काढण्यासाठी पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. कापडण्याचे माजी सरपंच प्रमोद पाटील, सोमनाथ पाटील, प्रभाकर गवळे यांनी मनोगत व्यक्त केले.

लहू पाटील, भगवान गर्दे, बाजीराव पाटील, गायत्री जयस्वाल, एन. डी. पाटील, नागेश देवरे, दिनकर पाटील, शांताराम भिल, भटू पाटील, अरुण पाटील, संजय देसले आदी उपस्थित होते. स्वातंत्र्य सैनिकांची भूमी म्हणून कापडण्याची ऐतिहासिक ओळख आहे. त्यात सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान, नंतर सभा होऊन पदयात्रेचा देवभाने, सरवडमार्गे सोनगीर येथे समारोप होईल.

MLA Kunal Patil speaking at a meeting on Monday in preparation for the Azadi Gaurav Padayatra to be taken out by the Congress.
युवकाची बिबट्याशी झुंज; मोराडे इस्टेट येथील घटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com