.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
चिमठाणे : हातनूर (ता. शिंदखेडा) शिवारातून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर सहा तलाठ्यांनी मंगळवारी (ता. १५) दुपारी पकडला. ट्रॅक्टर व वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह शिंदखेडा तहसील कार्यालयात आणत असताना, कुमरेज फाट्याजवळ वाळूमाफियांनी ट्रॅक्टर अडविला.
तलाठ्यांनी वरिष्ठांना कळविले. त्यावरून शिंदखेडा पोलिसांची गाडी आली. त्यांच्यासमोरून चालकाने ट्रॅक्टर कुमरेज गावाकडून पळवून नेला. २४ तास होऊन महसूल विभागाने कुठलीही कारवाई केली नाही, म्हणून आश्चर्य व्यक्त होत आहे. (Talathi sand tractor stolen from police custody)