

Life ended from Savalde bridge near Shirpur; Both had a love marriage.
Sakal
धुळे : शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील तापी नदीपात्रात एकमेकांच्या पायांना लोखंडी साखळीने बांधून कुलूप लावलेल्या अवस्थेत एका नवविवाहित तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण धुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या मृत दाम्पत्याची ओळख पटली असून, दोघांनी प्रेमविवाह केला होता. या धक्कादायक घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.