फोटो ओळी- 11139
नाशिक : केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांना निवेदन देताना कपिल तेलुरे व शिष्टमंडळ
खोजा नाईक राजाच्या किल्ल्याचे संवर्धन करा
बिरसा मुंडा आदिवासी मंचाचे मंत्री आठवलेंना निवेदन
नांदगाव, ता. ९ ः तालुक्यातील परधडी गावातील क्रांतिवीर खोजा नाईक राजाचा किल्ला सध्या जीर्ण झाला असून, या किल्ल्याचे तातडीने संवर्धन करून त्याचे स्मारकात रूपांतर करावे, अशी मागणी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा आदिवासी मंचाने केली आहे.
यासंदर्भात मंचाचे संस्थापक कपिल तेलुरे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. किल्ल्याची सध्याची पडझड व जीर्ण अवस्था स्पष्टपणे दिसून येणारी छायाचित्रेही निवेदनासोबत सादर करण्यात आली. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन किल्ल्याचे संवर्धन व विकास करावा. तसेच येथे खोजा नाईक यांचा पुतळा उभारून स्मारकाचे लोकार्पण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
खोजा नाईकांच्या शौर्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या ऐतिहासिक स्थळाचे जतन होणे गरजेचे असून, शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मंचाने व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष संजय भालेराव, नाशिक शहराध्यक्ष अर्जुन पगारे, जिल्हा कार्याध्यक्ष देवीदास मोरे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पवार, वंदेश गांगुर्डे, पंकज गरुड, राजाभाऊ गुडेकर, आकाश घुसळे, आदी उपस्थित होते.