Nashik : हत्यारांसह तडीपार संशयितास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suspect Arrested

Nashik : हत्यारांसह तडीपार संशयितास अटक

जुने नाशिक : चाकूसह (Knife) तडीपार (Deported) संशयितास (Suspect) भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून सोमवार (ता. ६) मध्यरात्री ताब्यात घेतले. सोहेल मोईउद्दिन शेख(२२, रा. पंचशीलनगर, म्हसोबावाडी), असे संशयिताचे नाव आहे. (deported suspect arrested with weapons Nashik Crime News)

हेही वाचा: Jalgaon : तरुणीच्या बनावट खात्याद्वारे इंस्टाग्रामवर चॅटींग करत बदनामी

गुन्हे शोध पथकातील सागर निकुंभ यांना तडीपार संशयित सोहेल शेख खडकाळी भागात वावरत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, रमेश कोळी, लक्ष्मण ठेपणे, धनंजय हासे यांनी संशयितास ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याच्याकडून चाकू हस्तगत करण्यात आला. पोलिस उपायुक्तांच्या आदेशानुसार ११ फेब्रुवारीला त्याला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विशेष तपासणीत १० रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या तपासणीसह ७ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली, तसेच २ जणांना समन्स बजावण्यात आले.

हेही वाचा: जळगाव : मागील भांडण उकरून एकाला बेदम मारहाण

Web Title: Deported Suspect Arrested With Weapons Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top