

नाशिक - परप्रांतीय महिलेस प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा, तसेच बळजबरीने कुराण पठण करण्यास भाग पाडून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या संशयिताचा शोध सुरू आहे.