मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश; नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गितेंची माघार

Nashik MLC Election: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी अर्ज माघारी न घेण्याची भूमिका घेतली होती. मात्र मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी केलेल्या मनधरणीला यश आलंय.
Nashik MLC Election

Nashik MLC Poll Sees Major Twist as Gite Backs Out

Esakal

Updated on

Maharashtra Politics: नाशिक विधानपरिषदेत महायुतीचा पेच सुटला असून गोकुळ गिते यांची मनधरणी करण्यात महाजन आणि सामंत यांना यश आलं आहे. यामुळे महायुतीचे नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी अर्ज माघारी न घेण्याची भूमिका घेतली होती. मात्र मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी केलेल्या मनधरणीला यश आल्याचा दावा महायुतीतील नेते करत आहेत. यासंदर्भात आज महायुतीची नाशिकमध्ये पत्रकार परिषद होणार असून त्यात गोकुळ गिते यांच्या अर्ज माघारीची अधिकृत घोषणा होणार असल्याचं समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com