Nashik Teacher Bharti : बिगरआदिवासी तालुक्यांनाही मिळाले गुरुजी; 222 शिक्षकांना मिळाली पदस्थापना

Teacher Bharti : पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पाडून पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याला प्राप्त झालेल्या शिक्षक यादीतील शिक्षकांना शनिवारी (ता. ९) समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात आली.
Additional Chief Executive Officer of Zilla Parishad Arjun Gunde, Deputy Chief Executive Officer Ravindra Pardeshi, Primary Education Officer Dr. Nitin Bachhao while giving appointment order to teacher Umesh Suryavanshi after posting through counseling.
Additional Chief Executive Officer of Zilla Parishad Arjun Gunde, Deputy Chief Executive Officer Ravindra Pardeshi, Primary Education Officer Dr. Nitin Bachhao while giving appointment order to teacher Umesh Suryavanshi after posting through counseling.esakal

Nashik Teacher Bharti : पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पाडून पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याला प्राप्त झालेल्या शिक्षक यादीतील शिक्षकांना शनिवारी (ता. ९) समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात आली. मराठी माध्यम १७३, गणित व विज्ञान ४५ तर, इंग्रजी माध्यमातील चार अशा एकूण २२२ शिक्षकांना पदस्थापना देत त्यांना आदेशाचे वितरण करण्यात आले. (Nashik Teacher Bharti Non tribal talukas marathi news)

पदस्थापना देताना प्रामुख्याने बिगरआदिवासी तालुक्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे शिक्षक नसल्याची ओरड असलेल्या नांदगाव, मालेगाव, येवला, चांदवड तालुक्यातील शाळांना शिक्षक मिळाले आहेत. पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ व मुलाखतीसह चार हजार ८७९ अशी एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही सुरू आहे.

त्यानुसार गुणवत्तेसह सर्व प्रकारच्या आरक्षणानुसार ११ हजार ८५ उमेदवारांची गुणवत्तायादी प्रसिद्ध करत, शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. पोर्टलवर एकूण २३० उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती. मूळ कागदपत्राच्या पडताळणीनंतर यादीतील १ ते २३० पात्र उमेदवारांची शनिवारी पदस्थापना देण्यासाठी प्रक्रिया राबविली गेली.

गंगापूर रोडवरील होरायझन ॲकॅडमीच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. शिक्षकास समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देत लागलीच नियुक्तीचे आदेश देण्यात आले. (latest marathi news)

Additional Chief Executive Officer of Zilla Parishad Arjun Gunde, Deputy Chief Executive Officer Ravindra Pardeshi, Primary Education Officer Dr. Nitin Bachhao while giving appointment order to teacher Umesh Suryavanshi after posting through counseling.
Nashik Teacher Bharti : जिल्ह्यात 46 शिक्षण संस्थांमधील 296 जागांसाठी भरती

उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, प्रभारी उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, अधिक्षक श्रीधर देवरे, सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराडे, लिपिक सरोज बागूल, जयवंत शिंदे, सूर शिंदे, अनिकेत गरुड, सलीम पटेल, अरुण भदाणे, सुनील सोनवणे आदी उपस्थित होते.

अवघड क्षेत्रात ४९ बदल्या

ही प्रक्रिया पार पडल्यानंतर नियमित बदली प्रक्रियेतील सहाव्या टप्प्यातील अवघड क्षेत्रातील बदली झालेल्या शिक्षकांच्या समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार बदलीत अवघड क्षेत्रात हजर झालेल्या ४९ शिक्षकांच्या समुपदेशन पद्धतीने बदल्या करण्यात आल्या.

रिक्त पदांचा भार झाला कमी

जिल्ह्यात शिक्षकांची एक हजार ३४ पदे रिक्त आहेत. यात बिगरआदिवासी तालुक्यांमधील नांदगाव (१३१), येवला (६७), चांदवड (५५), मालेगाव (८६), बागलाण (४८) या तालुक्यात रिक्त पदाची संख्या तुलनेने मोठी होती. त्यामुळे या भागाला शिक्षक मिळावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींची होती. त्यानुसार शिक्षण विभागाने प्रामुख्याने या भागातील तालुक्यांना प्राधान्य देत रिक्त पदे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

या तालुक्यांना मिळाले शिक्षक

नांदगाव (६९), येवला (३६), चांदवड (२७), इगतपुरी (७), मालेगाव (३७), बागलाण (१०), सिन्नर (२०), निफा़ड (१३), दिंडोरी व देवळा प्रत्येकी २ या प्रमाणे एकूण २२२ शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात आली.

Additional Chief Executive Officer of Zilla Parishad Arjun Gunde, Deputy Chief Executive Officer Ravindra Pardeshi, Primary Education Officer Dr. Nitin Bachhao while giving appointment order to teacher Umesh Suryavanshi after posting through counseling.
Teacher Bharti: उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांची साडेचार हजारांहून अधिक पदे; शिक्षण आयुक्तांकडून हिरवा कंदील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com