Nashik Teacher Bharti : जिल्ह्यात 46 शिक्षण संस्थांमधील 296 जागांसाठी भरती

शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषद व खासगी शिक्षण संस्थांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
Nashik Teacher Bharti
Nashik Teacher Bhartiesakal

Nashik Teacher Bharti : शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषद व खासगी शिक्षण संस्थांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ४६ संस्थांमधील शिक्षकांच्या रिक्त २९६ पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली. (Recruitment for 296 seats in 46 educational institutions in district for teacher nashik news)

त्यामुळे काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे शिक्षक भरतीच्या कार्यवाहीला मुहूर्त लागला असून, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा शिक्षक भरतीला अडथळा येऊ नये, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा परिषद, महापालिका, पालिकांच्या शाळांसह काही खासगी माध्यमिक शाळांमध्येही शिक्षक जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड केले जात आहे. जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.

Nashik Teacher Bharti
Teacher Bharti: प्राथमिक शिक्षक भरती बारा वर्षांपासून नाहीच; अठरा हजार जागा रिक्त, बंदी उठून देखील कार्यवाही नाही

मात्र, काही कारणांनी काही संस्थांच्या जाहिराती प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हाभरातील विविध शैक्षणिक संस्थांतंर्गत असलेल्या शाळांमधील २९६ शिक्षकांच्या रिक्त पदासाठी जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहे.

पवित्र पोर्टलवर ज्या ‘टेट’ उत्तीर्ण उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यांच्याकडून प्राधान्यक्रम भरून घेतले गेले असून, त्यासाठी असलेली १२ फेब्रुवारीचा मुदतही संपली आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीसंदर्भातील पुढील प्रक्रियेची सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

Nashik Teacher Bharti
Nashik Teacher Bharti : शिक्षक भरतीसंदर्भात पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com