Murder
Murderesakal

Nagpur Crime : भंगार वेचणाऱ्याचा खून; दुकानासमोर आढळला मृतावस्थेत

वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रजापतीनगरात असलेल्या किराणा मालाच्या गोदामासमोर भंगार वेचणाऱ्या युवकाचा मृतदेह आढळून आला.
Published on

नागपूर - वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रजापतीनगरात असलेल्या किराणा मालाच्या गोदामासमोर भंगार वेचणाऱ्या २८ वर्षीय युवकाचा मृतदेह बुधवारी (ता.२४) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आढळून आला. पोलिसांनी तपासणी केल्यावर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला.

मनोज बंगाली बंजारे असे युवकाचे नाव आहे. तो व्यसनी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून तो आपल्या भाऊ किसन (वय ३५, रा. आदर्शनगर झोपडपट्टी, नाल्या जवळ, नंदनवन) याच्यापासून वेगळा राहतो. भंगार आणि कचरा वेचण्याचे काम करीत असून ते विकून आलेल्या पैशात तो दारू आणि इतर नशा करीत असल्याची माहिती आहे.

दररोज रात्री तो या गोदामासमोरील जागेवर येऊन झोपायचा. आज सकाळी तो तिथेच पडून असल्याने त्याची माहिती वाठोडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी न्यायसाहाय्य वैद्यकांच्या चमूला पाचारण करण्यात आले. त्यांनी तपासणी केली असता, त्याच्या डोक्याच्या मागील भागावर वार करून त्याला जखमी केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली.

त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. मनोज दररोज दारूच्या नशेत राहायचा. काल त्यातून त्याचे कुणाशीतरी भांडण झाल्याने त्यातून त्याचा खून झाल्याची शंकाही पोलिसांनी व्यक्त केली. भारतीय न्याय संहीता कलम १०३, अन्वये गुन्हा दाखल करून, तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com