Nagpur Graduate Constituency Election
esakal
Nagpur Graduate Constituency Election: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच एक रंजक आणि काहीशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मतदारसंघाच्या निवडणुकीत विभागातील तब्बल १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. विशेष म्हणजे, आपल्या-आपल्या मतदारसंघात राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारे हे लोकप्रतिनिधीच पदवीधर मतदारसंघाचे मतदार नसल्याचं समोर आलं आहे.