Nagpur Heavy Rain
esakal
नागपूर शहरात आज मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या मोसमातील पहिलाच मोठा पाऊस असल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या सुमारे दोन तासापासून नागपूरमध्ये जोरदार पाऊस सुरू असून सखल भागांमध्ये नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.