Wheat Prices Rise in India
esakal
नागपूर : निसर्गाचा लहरीपणा आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा दुहेरी फटका आता थेट सर्वसामान्यांच्या ताटातील पोळीला बसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून गहू उत्पादक पट्ट्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम आवक घटण्यावर झाला आहे. परिणामी, बाजारात गव्हाच्या भावात किलोमागे दोन ते तीन रुपयांची वाढ झाली. गव्हाचे दर ऐन उन्हाळ्यात तेजीत आले आहेत.