NEET-UG पेपर लीक प्रकरणानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी आता Zero Trust Architecture प्रणाली लागू केली जाणार आहे. याअंतर्गत विषय तज्ज्ञ थेट प्रश्नपत्रिका तयार करणार नाहीत. त्याऐवजी सुमारे 10 हजार प्रश्नांच्या केंद्रीय प्रश्नपेढीत प्रश्न जमा केले जातील आणि संगणकीय अल्गोरिदमद्वारे अंतिम प्रश्नपत्रिका निवडली जाईल. तसेच प्रश्नांच्या भाषांतरासाठी 85 टक्के AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. NEET पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची गोपनीयता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. नेमकं काय बदलणार? विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम होणार? पाहा हा संपूर्ण व्हिडिओ...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.