

Shrirampur and Nana Patekar Borawke College Swapnapakshi and Nostalgic Memories Reveal His Special Connection With the Town
sakal
-महेश माळवे
श्रीरामपूर : आपल्या कसदार अभिनयाने, बाणेदार व्यक्तिमत्त्वाने आणि कडक संवादफेकीने रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या संस्मरणीय आठवणींचा प्रवास आज पुन्हा एकदा श्रीरामपूरकरांच्या हृदयात ताजा झाला. नानांच्या अभिनयाचे लाखो चाहते देशभर पसरलेले असले, तरी श्रीरामपूरकरांसाठी नाना हे केवळ एक महान अभिनेते नव्हते, त्यांचा या शहराशी ऋणानुबंध जोडला गेला होता.