Ravi Tamta Flying Car
esakal
इच्छा असेल आणि काहीतरी नवीन करण्याची जिद्द असेल, तर शिकण्याचा मार्ग आपोआप सापडतो, हे उत्तराखंडमधील रवी तमता या तरुणानं दाखवून दिलं आहे. अल्मोडा जिल्ह्यातील कला शाखेचा पदवीधर असलेल्या रवीने इंजिनिअरिंगचं शिक्षण न घेता इलेक्ट्रिक फ्लाइंग कारचं प्रोटोटाइप तयार केलं आहे. इंटरनेटवरून माहिती मिळवत आणि स्वतः प्रयोग करत त्याने तब्बल १३ वर्षं यावर काम केलं. त्यांच्या HAPIDA SKYNeX या एक आसनी वाहनाची ऑगस्टमध्ये चाचणी उड्डाणही पार पडली.