Leopard Yoga Video
Leopard Yoga VideoeSakal

Leopard Yoga : चक्क बिबट्याने केले सूर्यनमस्कार, IFS अधिकाऱ्याने शेअर केलेला व्हिडिओ होतोय व्हायरल

योग दिनानिमित्त हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होतो आहे.

२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जगभरात लोक योग करत आहेत. योगाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व किती आहे, हे आपल्याला माहितीच आहे. मात्र, तरीही धकाधकीच्या या जीवनात योग करण्यासाठी वेळ काढणं सगळ्यांनाच शक्य होत नाही.

तुम्हाला देखील योग करण्यासाठी मोटिव्हेशनची गरज असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये कोणी व्यक्ती नाही, तर चक्क बिबट्या सूर्यनमस्कार घालताना दिसतोय. योग दिनाच्या निमित्ताने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Leopard Yoga Video
Yoga Day 2023 : मोदींच्या 'योगा डे'चं लागलं देशाला वेड! श्वानाने देखील केले योगासन, Video Viral

काही महिन्यांपूर्वी IFS अधिकारी सुशात नंदा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओसोबत त्यांनी "सूर्यनमस्कार करताना बिबट्या" अशा आशयाचं कॅप्शन दिलं होतं. आता योग दिनानिमित्त हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होतो आहे. या व्हिडिओला दोन लाखांहून अधिक व्ह्यू आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत.

बिबट्या देतोय आळस

हा व्हिडिओ २७ सेकंदांचा आहे. या व्हिडिओमध्ये हा बिबट्या आळस देताना आणि स्ट्रेचिंग करताना दिसतोय. आळस देतानाची ही पोझ पाहून, सूर्यनमस्कार करताना ज्याप्रमाणे आपण स्ट्रेच करतो, त्याचीच आठवण येत आहे. त्यामुळेच हा बिबट्याही सूर्यनमस्कार करतोय की काय, असं वाटणं स्वाभाविक आहे.

दरम्यान, या व्हिडिओला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. काही लोक याला शिकारीपूर्वी स्ट्रेचिंग करत असल्याचं म्हणतायत, तर काही लोक या बिबट्याला फिटनेस-फ्रीक म्हणत आहेत.

Leopard Yoga Video
Best Yoga Apps : घरीच सुरू करायचाय योग? हे अ‍ॅप्स करतील मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com