

Nepal Earthquake Today: 5.3 Magnitude Near Lelep
esakal
नेपाळमध्ये मंगळवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी ५.३ तीव्रतेचा भूकंप झाला. सकाळी ७ वाजून २ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाचे धक्के भारत, भूतान आणि चीनमधील काही भागांतही जाणवले. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरच्या (EMSC) माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील लेलेप परिसरात होता. जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला. तर भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (NCS) भूकंपाची तीव्रता ५.३ आणि खोली २० किलोमीटर असल्याचे नोंदवले आहे.
NCS च्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र सिक्कीममधील युक्सोमच्या वायव्येला ६१ किलोमीटर अंतरावर होते. भूकंपाचे केंद्र २७.८५५ अक्षांश आणि ८७.९०९ रेखांशावर नोंदवण्यात आले.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा