Jalgaon Lok Sabha Constituency: 6 तासांच्या चर्चेनंतर श्रीराम पाटील यांच्या नावावर एकमत; घोषणेच्या औपचारिकतेची प्रतीक्षा

Lok Sabha Constituency : रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे उमेदवार निश्‍चित करण्यासाठी पुणे येथे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत मोदी बाग येथे सोमवारी (ता. ८) बैठक आयोजित करण्यात आली होती.
shriram patil
shriram patilesakal

Jalgaon Lok Sabha Constituency : रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे उमेदवार निश्‍चित करण्यासाठी पुणे येथे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत मोदी बाग येथे सोमवारी (ता. ८) बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यातील माजी आमदार सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे आदी उपस्थीत होते. (Jalgaon Lok Sabha Constituency Consensus on Shriram Patil name )

पक्षाकडून जिल्हा अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, उद्योगपती श्रीराम पाटील यांची नावे चर्चेत होती. तब्बल सहा तास चर्चा झाल्यानंतर उद्योगपती श्रीराम पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली आहे. पक्षातर्फे त्यांच्या नावाची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता रावेर मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे आणि महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांच्यात चुरशीचा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

श्रीराम पाटील यांचा पक्ष प्रवेश

श्रीराम पाटील यांनी काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता, मात्र त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षातर्फे रावेर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली होती. त्यांनी पक्षाचे नेते शरद पवार यांची भेटही मुंबई येथे घेतली होती. उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतर त्यांनी आज पुणे येथे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड व श्रीराम पाटील यांचे समर्थक उपस्थित होते.(latest marathi news)

shriram patil
Jalgaon Lok Sabha Constituency : पक्षापेक्षाही आता प्रतिष्ठा, अस्तित्वाची लढाई!

कोण आहेत श्रीराम पाटील?

श्रीराम पाटील हे जळगाव जिल्ह्यातील उद्योजक आहेत. रावेर तालुक्यात रणगाव येथील ते रहिवाशी आहेत. अत्यंत सामान्य परिस्थितीतून त्यांनी उद्योजक होण्यापर्यंत भरारी घेतली आहे. श्री साईराम प्लास्टिक अँड ईरिगेशन ही त्यांची कंपनी आहे. सिका या इलेक्ट्रिक टू व्हीलरचे उत्पादक तसेच श्रीराम फाउंडेशन रावेरचे अधक्ष आहेत. मराठा समाज भूषण, उद्योग भूषण हे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

रक्षा खडसेंविरूध्द सामना

रावेर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. त्यांच्याविरूध्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांचा सामना होणार आहे.

''पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे पक्षाची बैठक झाली. यात जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत श्रीराम पाटील यांचे नाव सर्वानुमते निश्‍चित झाले आहे. मात्र पक्षातर्फे अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून ती लवकरच करण्यात येणार आहे.''- ॲड.रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्ष जळगाव

shriram patil
Jalgaon Lok Sabha Constituency : प्रत्येक निवडणुकीत पाडळसरेचे ‘पहिले पाढे पंचावन्न’; 3 दशकांपासून केवळ प्रचाराचा मुद्दा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com