Jalgaon Lok Sabha Constituency : पक्षापेक्षाही आता प्रतिष्ठा, अस्तित्वाची लढाई!

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून गेल्या आठवड्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार समोर आले.
Unmesh Patil, Mangesh Chavan, Karan Pawar, Smita Wagh, Girish Mahajan
Unmesh Patil, Mangesh Chavan, Karan Pawar, Smita Wagh, Girish Mahajanesakal

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून गेल्या आठवड्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार समोर आले. भाजपतून नाराज होत शिवबंधन बांधणाऱ्या उन्मेष पाटलांचे त्यांना बळ मिळाले. सध्याची राजकीय स्थिती पाहता वाघ अन्‌ पवार उमेदवार असले तरी ही लढाई आता मंत्री गिरीश महाजन-आमदार मंगेश चव्हाण व माजी खासदार उन्मेष पाटलांमध्येच असेल. (Jalgaon Lok Sabha election)

असे राजकीय पटलावर दिसते. निवडणूक कार्यक्रम आयोगाकडून जाहीर होण्याआधीच भाजपने जळगाव जिल्ह्यातील दोन्ही रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघांतील आपले उमेदवार घोषित करून टाकले. मात्र त्यात जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून ते स्मिता वाघ यांना देण्यात आले.

लोकसभेत उमेदवारी कापली, विधानसभेतही मंगेश चव्हाण आमदार व पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असल्याने राजकीय असुरक्षिततेच्या भावनेतून उन्मेष पाटलांना भूमिका घेणे अपरिहार्य होते. त्यामुळे त्यांनी चाचपणी करत महाविकास आघाडीत ज्या शिवसेना ठाकरे गटाकडे ही जागा आहे, त्या पक्षाचा रस्ता धरला.

करण पवारांसोबत ‘हम साथ साथ’

पाटील एकटेच गेले नाही, तर त्यांनी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष व त्यांचे मित्र करण पवार यांनाही सोबत घेऊन त्यांच्याच नावाची या जागेसाठी शिफारस करून टाकली. पवारांनीही त्यास होकार दिला व ठाकरे गटाकडून ते उमेदवार बनले. आता भाजप उमेदवाराविरोधात करण पवारांसोबत लढायची जबाबदारी उन्मेष पाटलांनी स्वत:च्या अंगावर घेतली आहे.

खरी लढत महाजन-चव्हाणांशी

उन्मेष पाटील उच्चशिक्षित, अभ्यासू तरुण अन्‌ चांगले वक्तेही आहेत. दीर्घ राजकीय करिअरबाबत त्यांना आत्मविश्‍वास आहे. त्यामुळेच त्यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर काही दिवस एकूणच स्थितीचा अभ्यास केला व ठाकरे गटाचे शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतला. भाजपतील बदल्याची नीती, आत्मसन्मान या बाबी त्यांनी पक्ष सोडताना सांगितल्या. (jalgaon political news)

Unmesh Patil, Mangesh Chavan, Karan Pawar, Smita Wagh, Girish Mahajan
Jalgaon News : अमळनेरला शंभर दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना नोटिसा!

याद्वारे त्यांचा रोष मंत्री गिरीश महाजन व मंगेश चव्हाणांवर आहे. या दोघांवर टीका करताना त्यांनीही उन्मेष पाटलांना प्रत्युत्तर देण्याचे ठरवले. महाजनांनी जळगावात उन्मेष पाटलांचा तुटलेला संपर्क, मतदारसंघातील निष्क्रियता यावर बोट ठेवल्यानंतर चाळीसगावला मंगेश चव्हाणांनीही पाटलांवर ठेकेदारांना ब्लॅकमेल करण्यासह अन्य आरोप केले. महाजन-चव्हाण द्वयींच्या आरोपांना उन्मेष पाटीलही उत्तर देण्यासाठी पुढे येतील. त्यानिमित्ताने भाजपत गतकाळात काय चालले होते, काय झाले, हेही नेमकेपणाने समोर येईल.

आता खरी लढाई सुरू...

या संपूर्ण घडामोडींमध्ये प्रत्यक्ष रिंगणातील उमेदवार स्मिता वाघ व करण पवार शांत आहेत. ते त्यांच्या प्रचाराला लागले आहेत. मतदानाच्या दिवसापर्यंत उमेदवार म्हणून ते या वादापासून दूर राहून प्रचारावर भर देतील, असेच दिसते. या लढतीच्या निमित्ताने खरा वाद होतोय तो महाजन-चव्हाण व उन्मेष पाटलांमध्ये. येणाऱ्या काळातही या तिघांमध्येच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत.

पक्ष सोडल्यानंतर घेतलेल्या भूमिकेमुळे करण पवारांना निवडून आणण्याची जबाबदारी घेणारे उन्मेष पाटील यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. महाराष्ट्रात भाजपच्या विद्यमान खासदाराने फुटून ठाकरे गटात जाण्याची ही पहिलीच घटना असल्याने जिल्ह्याचे नेते व संकटमोचक म्हणून गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांच्यावर स्मिता वाघ यांना निवडून आणायची जबाबदारी आहे. परिणामी, या गुरू-शिष्यांसाठी ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे.

Unmesh Patil, Mangesh Chavan, Karan Pawar, Smita Wagh, Girish Mahajan
Jalgaon News : शेतकऱ्यांना प्रतीक्षा पीककर्जाची! बँका, विकास संस्थांमध्ये कर्ज वितरणाची तयारी सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com