Jalgaon Crime News : मुलीच्या नादी लागल्याच्या संशयातून गोळीबार

Jalgaon Crime : मेहरुण परीसरातील श्रीराम कन्याशाळेजवळ सोहम गोपाल ठाकरे (वय १८) या तरुणावर शुक्रवारी गोळीबार करुन फरार झालेल्यापैकी दोघांना पोलिसांनी २४ तासांत अटक केली.
Suspect
Suspectesakal
Updated on

Jalgaon Crime News : मेहरुण परीसरातील श्रीराम कन्याशाळेजवळ सोहम गोपाल ठाकरे (वय १८) या तरुणावर शुक्रवारी गोळीबार करुन फरार झालेल्यापैकी दोघांना पोलिसांनी २४ तासांत अटक केली. तर इतर दोघांचा तपास सुरु आहे.

शहरात मेहरुण येथे सोहम गोपाल ठाकरे (वय १८ ) हा शुक्रवार (ता.१) मित्रांसह मेहरुण परिसरातील नमस्कार मॉल जवळ बोलत असतांना दोन दुचाकीवरुन आलेल्या दिक्षात ऊर्फ दादु देविदास सपकाळे, गोपाल चौधरी यांच्यासह इतर दोघांनी सोहम याला शिवीगाळ मारहाण सुरु केली. (Jalgaon Police arrested two people who escaped after shooting at youth)

पिस्तूल रोखले

दिक्षांत ऊर्फ दादु सोहमला मारहाण करत असतांनाच कंबरेत हात घालून पिस्तुल काढत असल्याचे दिसताच सोहम जिव वाचवण्यासाठी पळाला. त्याच्या दिशेने गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

केवळ दैव बलवत्तर म्हणुन सोहम वाचला. गोळीबारानंतर अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदिप गावीत, निरीक्षक बबन अव्हाड, निरीक्षक किशन नजन पाटिल पोलिसांच्या फौजफाट्यासह दाखल झाले. (latest marathi news)

Suspect
Nandurbar Crime News : जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीस 2 वर्षांचा कारावास

दोन संशयीत धुळ्यातून अटक

संशयित चौघांनी धुळ्याच्या दिशेने पळाल्याने त्याचा माग काढतांना पोलिसांनी धुळ्यात दिंक्षात ऊर्फ दादु याच्या आत्याच्या घरात तो आणि गोपाल चौधरी असे दोघेही मिळून आले असून त्यांच्या मागावर असलेल्या पथकातील उपनिरीक्षक दिपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, किशोर पाटिल, सचिन मुंडे, किरण पाटिल, छगन तायडे, ललीत नारखेडे अशांच्या पथकाने दोघांना अटक करुन जळगावी आणले.

Suspect
Nagpur Crime: संतापजनक! शंभर रुपयांसाठी मुलाकडून आईचा खून, भोकरबर्डी येथील घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com