Tukaram Mundhe Pattern : तुकाराम मुंढे पॅटर्न! रत्नागिरीत ६० हॉटेल्सवर छापे; अनेक हॉटेल्सना नोटीस, ६ लाखांचा गुटखा जप्त

Gutkha Seized in Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाच्या मोठ्या कारवाईत ६० हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. अनेक हॉटेल्सना नोटिसा देण्यात आल्या असून ६ लाख रुपयांचा गुटखा जप्त झाल्याने खळबळ उडाली आहे.
Tukaram Mundhe Pattern ratnagiri

Tukaram Mundhe Pattern ratnagiri

esakal

Updated on

Food and Drug Administration Action : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची धुरा तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. याचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. मुंढे यांच्या कडक आदेशानंतर रत्नागिरीचे अन्न व औषध प्रशासनाकडून अवैध गुटखामाफिया आणि नियमबाह्य हॉटेल चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आठ ठिकाणी छापे टाकून सहा लाखांचा गुटखा जप्त केला असून, ६० हॉटेलची झडती घेण्यात आली. त्यातील चार जणांना सुधारणा करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com