Ratnagiri
रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेला एक सुंदर जिल्हा आहे. रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर (कोकण) आहे. जिल्ह्याला सुमारे १६१ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला. जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर असे नऊ तालुके आहेत. रत्नागिरीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असून लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म आणि वावर या जिल्ह्यात झाला. रत्नागिरीचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे.