

Rajat Patidar | India A vs Australia A
Sakal
India A vs Australia A,1st ODI: मंगळवारी (६ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात १२५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघाकडून नॅथन मॅकस्विनी, कर्णधार विल सदरलँड आणि माहली बिअर्डमन यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताकडून रजत पाटीदारने एकाकी झुंज दिली, पण त्याची झुंज व्यर्थ ठरली.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने भारतीय अ संघासमोर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय अ संघ ३१.४ षटकात १४९ धावांवरच सर्वबाद झाला.